01 July, 2021

 जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडीसाठी 22 जुलै रोजी विशेष सभेचे आयोजन

 

        हिंगोली (जिमाका) , दि. 01 : येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीच्या सभापती श्रीमती रत्नमाला चव्हाण यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. हे रिक्त पद भरण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 90 (2) व कलम 83 चे उपकलम 1-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी हिंगोली यांनी जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकांसंदर्भात दिनांक 22 जुलै, 2021 रोजी दुपारी 2.00 वाजता हिंगोली जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभा आयोजित केली आहे. या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांची नेमणूक करण्यात आली आहे.

उक्त सभापती पदाची निवडणूक ही जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषद (अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती) व (पंचायत समित्याचे सभापती, उपसभापती) निवडणूक नियम-1962,  त्याखालील नियम व तरतुदीनुसार कोविड-19 नियमाचे पालन करुन प्रक्रिया पूर्ण करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सभेच्या इतिवृत्तासह जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी दिले आहेत.

****

No comments: