09 July, 2021

 

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे

डिजिटल पध्दतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

हिंगोली (जिमाका) , दि. 9 :  मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दि. 8 जुलै, 2021 रोजी डिजिटल पध्दतीने करण्यात आले.

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचा प्रशिक्षण केंद्र म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये हेल्थ केअर स्कील कौन्सिल मार्फत राष्ट्रीय स्तरावर एनएसक्युएफ सुसंगत असलेले आरोग्य क्षेत्रातील एकूण 36 महत्वपूर्ण अभ्यासक्रम निवडण्यात आलेले आहेत.

प्रशिक्षणासाठी हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय या प्रशिक्षण केद्रावर असिस्टंट योगा इंन्स्ट्रक्टर या कोर्सच्या उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना टुल किट (ॲप्रोन, सॅनिटायझर, मास्क , आयकार्ड इ.)  चे वाटप सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच उर्मिला मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल,हिंगोली या प्रशिक्षण केंद्रावरील जनरल ड्युटी असिस्टंट ॲडव्हॉन्स या कोर्सच्या प्रशिक्षणार्थ्यांनी फेसबुक  लाईव्हद्वारे सहभाग नोंदविला.

यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील सुमित पोटे, प्रवीण रुद्रकंठवार, प्रि.ग. कनके हे उपस्थित होते.

****

No comments: