पालकमंत्री
वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते जिल्हास्तरीय शिक्षक स्पर्धेचे उद्घाटन
हिंगोली, दि. 09 (जिमाका) : जिल्ह्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन स्पर्धांचे
उद्घाटन आज राज्याचे शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री वर्षाताई
गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या स्पर्धेच्या
उद्घाटन येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले,
खासदार हेमंत पाटील , आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार
राजू नवघरे , विल्पव बाजोरिया, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी परसराम पावसे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शिक्षण
विभागाच्या वतीने हिंगोली
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या ऑनलाइन स्पर्धा दि. 09 जुलै,
2021 ते 30 जुलै, 2021 या कालावधीमध्ये आयोजित
करण्यात येणार आहेत. या स्पर्धा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या प्रेरणेने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहेत. या स्पर्धांमध्ये कोरोना काळातील शैक्षणिक उपक्रम, बेस्ट एज्यूकेशनल व्हिडिओ, पाठ्यपुस्तकातील कविता
गायन, वैयक्तिक व सामूहिक नृत्य, मुख्याध्यापक यांच्यासाठी मी घडवलेली
शाळा, ऑनलाईन गणित-विज्ञान सामान्यज्ञान
स्पर्धा (kahoot)आणि पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी वाद विवाद
स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे .
स्पर्धांच्या स्वरुपाचे
सादरीकरण शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी केले.
*****
No comments:
Post a Comment