जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्घाटन
हिंगोली, दि. ३ ऑक्टोबर (जिमाका) : शासनाच्या निर्देशानुसार दि. ३ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा उद्घाटन कार्यक्रम नायब तहसीलदार संतोष बोथीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा गौरव, संवर्धन आणि प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सप्ताहाच्या कालावधीत मराठी भाषेविषयी जनजागृती करणारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास श्रीमती वहिदा काझी, महसूल सहाय्यक, रमेश मुकाडे, सहाय्यक महसूल अधिकारी, वामन मोरे, अंकुश सोनटक्के, डी. एस. निमजे, महसूल सहाय्यक तसेच प्रिया पखाले, चाइल्ड हेल्पलाईन यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment