03 May, 2025

वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा केंद्रावर नीटची आज परीक्षा * परीक्षा केंद्र परिसरात १६३ कलम लागू

हिंगोली (जिमाका),दि.०३ : राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या नीट (NEET (UG) -2025 या परीक्षा रविवार दिनांक 04 में 2025 रोजी दुपारी 2 ते 5 तसेच दिव्यांग उमेदवारांची दुपारी 2 ते 6 या वेळेत जवाहर नवोदय विद्यालय, वसमत जि. हिंगोली या उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय, वसमत, जि. हिंगोली या परीक्षा केंद्रावर अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अनिल माचेवाड यांनी त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करून परिक्षेच्या कालावधीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू केले आहेत. या परीक्षा केंद्रावर खालील प्रमाणे निर्बंध घालण्यात येत आहेत. या परीक्षा उपकेंद्राच्या इमारत व परिसरामध्ये परिक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्ती शिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बुथ चालू ठेवण्यास निर्बंध राहील. हे आदेश नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हे आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे. अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, पेजर, गणकयंत्र (Calculater) इत्यादी घेवून जाण्यावर बंदी राहील. तसेच संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने अणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात येतील, असे आदेश देण्यात आले आहे. **

No comments: