29 May, 2025

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा आज हिंगोली जिल्हा दौरा

हिंगोली, दि. २९ (जिमाका): सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर या आज हिंगोली जिल्हा दौ-यावर येत आहेत. श्रीमती बोर्डीकर यांचे दुपारी २:१५ वाजता परभणी येथून हिंगोलीतील संत नामदेव पोलीस परेड मैदान येथे हेलिकॉप्टरने आगमन होईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील रामलीला मैदानावर आयोजित विविध विकासकामांच्या लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमास त्या उपस्थित राहतील. त्यानंतर राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर दुपारी ४ वाजता संत नामदेव पोलीस परेड मैदान येथून हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील. **

No comments: