02 May, 2025
स्मार्टचे प्रमुख अशोक किरन्नळी यांची श्री फाळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीला भेट
हिंगोली (जिमाका), दि. 02 : राज्याचे प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) चे प्रमुख तथा कृषी संचालक(आत्मा) अशोक किरनळ्ळी यांनी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथील श्री फाळेश्वर महाराज शेतकरी उत्पादक कंपनीला नुकतीच भेट देऊन बांधकामाची पाहणी केली.
यावेळी श्री. किरन्नळी यांनी कामाची सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच मशिनरी उभारणी, घटक लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. खरेदी-विक्री बाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी संचालक मोतीराम वैद्य यांच्याकडून श्री. किरनळ्ळी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख जिल्हा अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) तथा प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र कदम, स्मार्टचे नोड अधिकारी जी. बी. बंटेवाड, कंपनीचे संचालक व इतर सभासद उपस्थित होते.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment