वृत्त क्र. 163 दिनांक : 21 एप्रिल, 2017
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागातर्फे सन 2017-2018 साठी अनुसूचित जाती / जमाती विमुक्त जाती व भटक्या जमाती,
इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारिरीक व मानसिकदृष्टया अपंग, कुष्ठरोगी वगैरेसाठी तसेच समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य
करणाऱ्या राज्यातील व्यक्ती / संस्थांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
दिला जाणार आहे. तरी जिल्हयातील इच्छुक पात्र उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
कार्यालय, हिंगोली येथे दि. 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत
सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
व्यक्ती
व सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या
अटी पुढील प्रमाणे असणार आहे. या योजनेनुसार समाज कल्याण
आणि कलात्मक साहित्य क्षेत्रात कार्य तथा कल्याणासाठी झटणारे नामवंत व्यक्ती / समाजसेवक असावेत, समाज कल्याण
क्षेत्रात व्यक्तींचे काम कमीत
कमी 15 वर्षे
कार्य केलेले असावेत, स्वयंसेवी संस्था या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त
अधिनियम 1950 व संस्था नोंदणी 1860 अंतर्गत नोंदणीकृत असाव्यात, स्वयंसेवी संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य 05 वर्षाहून अधिक असावे. विशेष मौलिक व मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद
म्हणून शिथिल करण्यात येईल. पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ)
पुरुष 50 वर्षे
अथवा त्यापेक्षा जास्त. ब) स्त्रीया 40
वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणत्याही व्यक्तीस त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही, पुरस्कार मिळण्यास पात्रता व्यक्तीगत मौलिक कार्यावरुन ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा याबाबतीत विचार करण्यात येणार नाही, व्यक्तींचे गैरवर्तनाबाबत खटला
किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र व अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा, मागील पाच
वर्षोचे लेखापरिक्षण अहवाल आवश्यक, संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
आवश्यक, संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्यांविरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही
झालेली नसावी, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला
नसल्याचे प्रमाणपत्र, व्यक्ती / संस्थेनी केलेल्या विशेष कार्याचा तपशिल देणे
आवश्यक आहे.
*****
वृत्त क्र. 164
साहित्यरत्न
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागातर्फे सन 2017-2018 साठी मांतग समाजाकरिता कला, साहित्य, शैक्षणिक क्षेत्रात
कार्यकरणारे नामवंत, कलावंत, साहित्यिक व समाज सेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील
व्यक्ती / संस्थांना साहित्यरत्न लोकशाहिर
अण्णाभाऊ साठे पुरस्कार दिला जाणार आहे. तरी जिल्हयातील इच्छुक पात्र मातंग समाजातील उमेदवारांनी सहाय्यक
आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दिनांक 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण
प्रस्ताव तीन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली
यांनी केले आहे.
व्यक्ती
व सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या
अटी पुढील प्रमाणे असणार आहे. मांतग समाजाकरिता कला, साहित्य, शैक्षणिक क्षेत्रात कार्यकरणारे नामवंत,
कलावंत, साहित्यिक व समाज सेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील व्यक्ती व संस्था,
समाज कल्याण क्षेत्रात व्यक्ती व संस्थेचे कमीत
कमी 10 वर्षे
कार्य केलेले असावेत, वैयक्तीक पुरस्कार
देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ) पुरुष 50 वर्षे
अथवा त्यापेक्षा जास्त. ब)
स्त्रीया 40 वर्षे
अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणत्याही व्यक्ती
व संस्थेस त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही, पुरस्कार मिळण्यास
पात्रता व्यक्तीगत मौलिक कार्यावरुन ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा
याबाबतीत विचार करण्यात येणार नाही, व्यक्तींचे गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली
नसल्याचे प्रमाणपत्र, सार्वजनिक संपत्तीचा
अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, मांतग समाज सेवा व विकास या क्षेत्रात काम पाहुन पुरस्कारासाठी
काम पाहुण पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल, स्वयंसेवी संस्था, या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 व संस्था नोंदणी 1860
अंतर्गत विशेष मौलिक व मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद
म्हणून शिथिल करण्यात येईल, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र व अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा, मागील पाच
वर्षोचे लेखापरिक्षण अहवाल आवश्यक, संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
आवश्यक, संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्यां विरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही
झालेली नसावी, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
आहे.
*****
वृत्त क्र. 165
पद्मश्री
कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्काराकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागातर्फे सन 2017-2018 साठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहिन, शेतमजूर
व दुर्बल घटकाचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील
संस्था / व्यक्तींना पद्यश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार
दिला जाणार आहे. तेंव्हा हिंगोली जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज
कल्याण कार्यालय, हिंगोली येथे दि. 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव
तीन प्रतीत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले
आहे.
व्यक्ती
व सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या
अटी पुढील प्रमाणे असणार आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील भूमीहिन, शेतमजूर व दुर्बल घटकाचे
कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक यांचे मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 व संस्था नोंदणी 1860
अंतर्गत विशेष मौलिक व मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद
म्हणून शिथिल करण्यात येईल, समाज कल्याण क्षेत्रात व अनु.जाती व नवबौध्द समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण,
आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रध्दा रुढी निर्मूलन, जनजागृती, भूमीहिन शेतमजूर यांचे
कल्याण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाना हा पुरस्कार दिला जाईल, समाज कल्याण क्षेत्रात व्यक्तीस कमीत
कमी 15 वर्षे
कार्य केलेले असावेत, समाज कल्याण क्षेत्रात संस्थेस कमीत
कमी 10 वर्षे
कार्य केलेले असावे, विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत
अट शिथिल करण्यात येईल, हा पुरस्कार मिळण्यास जात, धर्म, लिंग, क्षेत्र हया गोष्टींचा
विचार केला जाणार नाही, लोकनियुक्त प्रतिनिधी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत, वैयक्तीक पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ) पुरुष 50 वर्षे
अथवा त्यापेक्षा जास्त. ब)
स्त्रीया 40 वर्षे
अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणत्याही व्यक्ती व संस्थेस त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही, व्यक्तींचे गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली
नसल्याचे प्रमाणपत्र, सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, स्वंयसेवी
संस्था राजकारणापासून स्वतंत्र व अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा. संस्थेविरुध्द
किंवा पदाधिकाऱ्यां विरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी.
*****
वृत्त क्र. 166
संत
रविदास पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागातर्फे सन 2017-2018 साठी चर्मकार समाजाचे कल्याणसाठी झटणारे नामवंत समाजसेवक
यांचे मौलिक कार्य करणाऱ्या राज्यातील व्यक्ती
/ संस्थांना संत रविदास पुरस्कार
दिला जाणार आहे. तेंव्हा हिंगोली जिल्हयातील इच्छुक संस्थांना / व्यक्ती उमेदवारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
कार्यालय, हिंगोली येथे दि. 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन प्रतीत
सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
व्यक्ती
व सामाजिक संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या
अटी पुढील प्रमाणे असणार आहे. चर्मकार समाजाचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक यांचे मौलिक कार्य
करणाऱ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 व संस्था नोंदणी 1860
अंतर्गत विशेष मौलिक व मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद
म्हणून शिथिल करण्यात येईल, समाज कल्याण क्षेत्रात चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी
शिक्षण, आरोग्य, अन्याय निर्मूलन, अंधश्रध्दा रुढी निर्मूलन, जनजागृती इत्यादी क्षेत्रात
कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थाना हा
पुरस्कार दिला जाईल, समाज कल्याण क्षेत्रात व्यक्तीस कमीत
कमी 15 वर्षे
कार्य केलेले असावेत, समाज कल्याण क्षेत्रात संस्थेस कमीत
कमी 10 वर्षे
कार्य केलेले असावे, विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत
अट शिथिल करण्यात येईल, लोकनियुक्त प्रतिनिधी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत, वैयक्तीक पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ)
पुरुष 50 वर्षे
अथवा त्यापेक्षा जास्त. ब) स्त्रीया 40
वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे, कोणत्याही
व्यक्ती व संस्थेस त्यांच्या आयुष्यात एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही, व्यक्तीं
गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र,
सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र व अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा, संस्थेविरुध्द
किंवा पदाधिकाऱ्यां विरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी.
*****
वृत्त क्र. 167
शाहु,
फुले, आंबेडकर पारितोषिक पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि.21: समाज कल्याण विभागामार्फत सन 2017-2018 साठी संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल व मागासवर्गीय घटकातील
व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, रोजगार अशा व या सारख्या व्यक्तीगत
व सामुहिक क्षेत्रामध्ये एकमेव अद्वितीय कार्य केलेल्या संस्थांना शाहु, फुले, आंबेडकर
पारितोषिक पुरस्कार दिला जाणार आहे. तेंव्हा हिंगोली जिल्हयातील इच्छुक संस्थांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
कार्यालय, हिंगोली येथे दिनांक 30 एप्रिल, 2017 पर्यंत आपले परिपुर्ण प्रस्ताव तीन
प्रतीत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.
सामाजिक
संस्था पुरस्कारासाठी पात्रतेच्या अटी पुढील प्रमाणे
असणार
आहे. स्वयंसेवी संस्था, या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 व संस्था नोंदणी 1860
अंतर्गत विशेष मौलिक व मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थाच्या बाबतीत अट अपवाद
म्हणून शिथिल करण्यात येईल, संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल व मागासवर्गीय घटकातील
व्यक्ती व समाजासाठी सेवा, शिक्षण, आरोग्य, पुनर्वसन, रोजगार अशा व या सारख्या व्यक्तीगत
व सामुहिक क्षेत्रामध्ये एकमेव अद्वितीय कार्य केलेल्या संस्थेस हा
पुरस्कार दिला जाईल, समाज कल्याण
क्षेत्रात संस्थेस कमीत
कमी 10 वर्षे
कार्य केलेले असावे, विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थेच्या बाबतीत
अट शिथिल करण्यात येईल. वैयक्तीक पुरस्कार देताना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय अ)
पुरुष 50 वर्षे
अथवा त्यापेक्षा जास्त. ब) स्त्रीया 40
वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे,
कोणतीही संस्था एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही, सार्वजनिक
संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र, स्वंयसेवी संस्था राजकारणापासून स्वतंत्र व अलिप्त असावी, संस्थेमध्ये कोणताही गैरव्यवहार नसावा, संस्थेविरुध्द किंवा पदाधिकाऱ्यां
विरुध्द फौजदारी गुन्हा किंवा दंडात्मक कार्यवाही झालेली नसावी.
*****