26 April, 2017

हिवताप आजाराचे उच्चाटन करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन
        हिंगोली, दि. 26 :  जिल्हा हिवताप कार्यालय, हिंगोली तर्फे जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. जयदिप देशमुख, दलितमित्र व ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय निलावार, नेत्ररोग तज्ञ डॉ. किशन लखमावार, बालरोग तज्ञ डॉ. दिपक मोरे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बंदखडके यांच्या उपस्थितीमध्ये सामुहिक हिवताप या आजाराचे उच्चाटन करणेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच डॉ. विजय निलावार यांनी हिवताप आजाराविषयी आरोग्य यंत्रणेला दोष देणे योग्य बाब नसल्याबाबत मत व्यक्त केले व जनतेने आपल्या सभोवताचा परिसर स्वच्छ ठेऊन सांडपाणी साचणार नाही व डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
            डॉ. आकाश कुलकर्णी यांनी एक दिवस कार्यक्रम राबवुन हिवताप आजाराचे उच्चाटन होणार नसून जनतेने पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेऊन डासोत्पत्ती होऊ नये म्हणून प्रयत्न्‍ करावे. आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन केले. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा, सभोवतालच्या परिसरामध्ये डबकी साचु देऊ नयेत. तसेच हिवताप हा आजार मुख्यत्वे गरोदर महिला व लहान बालकांना होत असल्यामुळे डासांपासून संरक्षण करणेसंबंधी घराच्या खिडक्यांना जाळी बसवावी अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
            तसेच सर्व मान्यवरांचे, कर्मचारी वृंदांचे व उपस्थितांचे डॉ. गजानन चव्हाण यांनी आभार मानले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय येथून भव्य दुचाकी रॅलीचे मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घघाटन करण्यात आले. त्यानंतर सदर रॅलीचे जिल्हा हिवताप कार्यालय येथे विसर्जन करण्यात आले. जिल्हा हिवताप कार्यालय येथे उत्कृष्ठ कर्मचाऱ्यांचा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
            सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. गोलाईतकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सी. जी. रणवीर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. एम. गवळी, यु. टी. डाफणे, आर. बी. जोशी, आर. एस. दरगू, बी. आर. कुटे, एस. व्ही. नाईक, श्री. पुंडगे, श्री. महात्मे, प्रज्योत इंगोले, एस. पी. दहातोंडे, एस. पी. काळे, एम. एम. घुले, ए. एम. मुंढे, बी. के. मस्के, श्री. नलगे, श्री. पतंगे तसेच आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

                                                                                                ***** 

No comments: