जागतिक हिवताप दिनानिमित्त एक
दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन
हिंगोली, दि.
24 : हिवतापाचा प्रसार ॲनाफिलीस डासाच्या मादीपासून होतो.
या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते. उदा. भातशेती, स्वच्छ पाण्याची
डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे इत्यादी मध्ये होते. हिवताप प्रसारक ॲनाफिलीस
डासाची मादी हिवताप रुग्णास चावल्यावर रक्ताबरोबर हिवतापाचे जंतु डासाच्या पोटात जातात.
तेथे वाढ होऊन डासांच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. निरोगी मनुष्याच्या
शरीरात सोडले जातात. निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतु यकृतामध्ये जातात व तेथे त्याची
वाढ होऊन 10 ते 12 दिवसांनी मनुष्याला थंडी वाजुन ताप येतो.
हिवतापाचा प्रसार
:
थंडी वाजुन ताप येणे, ताप हा सततचा असु शकतो किंवा एक दिवस आड येऊ शकतो, नंतर घाम येऊन
अंग गार पडते, डोके दुखते, बऱ्याच वेळा उलट्या होतात. हिवतापाचे निदान : हिवतापाच्या निश्चित निदानासाठी तापाच्या रुग्णाच्या
रक्तनमुना घेऊन तो सुक्ष्मदर्शकाखाली तपासणे आवश्यक असते. हिवताप उपचार - सुधारित उपचार पध्दती : रक्तनमुना घेतल्यावर हिवताप लक्षणे
युक्त रुग्णास उपचार संशयित हिवताप रुग्णाचा रक्तनमुना घेऊन त्यांना वयोगटानुसार क्लोरोक्वीन
गोळ्यांची पुर्ण मात्रा द्यावी व सुक्ष्मदर्शकाव्दारे रक्तनमुने तपासणी अंती हिवतापाचे
निश्चित निदान झाल्यावर संबंधित रुग्णास जंतुच्या प्रकारानुसार योग्य तो औषधोउपचार
देण्यात यावा.
किटकजन्य रोगांना
प्रतिबंध : हिवताप / डेंगु/ चिकनगुणीया हे सर्व रोग स्वच्छ पाण्यात डास अंडी घालुन
त्यापासून डास अळी व नंतर डास तयार होतात याला प्रतिबंध करण्यासाठी घरातील सर्व पाणीसाठे
आठवड्यातून एक दिवस धुवुन पुसुन कोरडे करणे (कोरडा दिवस पाळणे) आवश्यक आहे. घाण पाण्यात
क्युलेक्स डासाची मादी अंडी घालते व त्यापासून हत्तीरोगाची लागण होते म्हणून आपल्या
परिसरातील सर्व नाल्या वाहत्या होतील डबकी, खड्डे यांच्यात पाणी साचुन राहणार नाही
यांची काळजी घेतली तर हिवताप/डेंगु/चिकुणगगुणीया/हत्तीरोग होण्यात प्रतिबंध होऊ शकतो,
असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. जि. के. चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
*****
No comments:
Post a Comment