13 April, 2017

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली, दि. 13 : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन आणि अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. दिलीप कांबळे हे दिनांक 15 एप्रिल, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्याचा तपशिल पुढीलप्रमाणे असणार आहे.
शनिवार, दि. 15 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 8.00 वाजता शासकीय विश्रामगृह औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने जालना जिंतूरमार्गे हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. दुपारी 02.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक. सायंकाळी 05.00 वाजता हिंगोली येथून वाहनाने परभणीकडे प्रयाण.

*****

No comments: