जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत
केली कामाची पाहणी
हिंगोली, दि. 26 : लघुसिंचन
( जलसंधारण ) विभागाकडून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत होत असलेल्या कामाची जिल्हाधिकारी
अनिल भंडारी यांनी पाहणी केली.
सदरील
काम पाहणीच्या वेळी लघु सिंचन (जलसंधारण) विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. साहु,
सहाय्यक अभियंता श्रेणी - 1 पी. एस. खिराडे, उपविभागीय अधिकारी ए. आर. अशरफी, स्थापत्य
अभियांत्रिकी सहाय्यक जे. पी. वाबळे व संबंधित गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामाच्या पाहणी अंतर्गत
जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी मौजे पेडगांव ता. हिंगोली येथील सिमेंट नाला बांध
क्र. 1 व 2 ची पाहणी केली. दोन्ही कामे भौतिक दृष्ट्यापुर्ण झाले असून नाला खोलीकरण
पक्के खडकापर्यंत पुर्ण झालेले असून पिचींग काम शिल्लक आहे. कामाची लांबी 16 मीटर असून
साठवण क्षमता 5 टीसीएम आहे. कामे गुणवत्तापुर्वक झालेले असून किरकोळ कामे पावसाळ्यापूर्वी
करावे अशा प्रकारच्या सुचना दिल्या. सिमेंट नाला बांध क्र. 2 हा गावाजवळील पाण्याच्या
विहीरीजवळ असल्यामुळे त्यांचा फायदा होईल व खरीप हंगामासाठी सुरक्षित सिंचन उपलब्ध
होऊन पाणी पातळीत वाढ होईल, असे जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधुन चर्चा
केली.
तसेच मौजे मसोड ता. कळमनुरी येथील सिमेंट
नाला बांध क्र. 1 व 2 ची पाहणी केली. सदरील काम प्रगतीपथावर असून सिमेंट कॉक्रींटचे
काम चालु होते. प्रत्यक्ष कामावर मोठ्या आकाराची खडी आढळून आली असता लहान आकाराची खडी
वापरण्याबाबत सुचना दिल्या. तसेच उपस्थित शेतकऱ्यांनी कामे गुणवत्तापुर्वक चालु असल्याबाबत
सांगितले. नाला खोलीकरणाचे काम चांगले झाले असून 10 टी. सी. एम. पाणी साठा निर्माण
होणार आहे. तसेच 10 हेक्टर सिंचन खरीपामध्ये सुरक्षित सिंचन होणार आहे. तसेच 2016-17
मधील सिमेंट बंधारे 2 जून, 2017 पर्यंत पुर्ण करण्याचे सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या
आहेत. तसेच मौजे शिवणी ता. कळमनुरी येथील जलसंधारण महामंडळामार्फत बांधण्यात आलेल्या
व्दारयुक्त सिमेंट बंधाऱ्याची देखील पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. या
बंधाऱ्यामुळे 15 टी. सी. एम. पाणीसाठा होणार आहे.
*****
No comments:
Post a Comment