उद्योजकता व व्यवसाय व्यवस्थापन पदविका
अभ्यासक्रमास सुरवात
हिंगोली, दि. 28 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,
औरंगाबाद व भारतीय उद्योजकता विकास संस्था अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एक वर्ष
कालावधीच्या दुर शिक्षण माध्यमातुन “उद्योजकता व व्यवसाय व्यवस्थापन
पदविका”
“Diploma in
Entrepreneurship & Business Management” या अभ्यासक्रमाची संपुर्ण महाराष्ट्रात
सुरुवात करण्यात येत आहे.
या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रकल्प मार्गदर्शन केंद्र
( PGC ) म्हणुन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र औरंगाबादने ई.डी.आय.आय. अहमदाबाद या राष्ट्रीय स्तरावरील
उद्योजकता विकास संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. सदर पदविका अभ्यासक्रमाचे मुख्य
वैशिष्टय म्हणजे लाभार्थीमधील उद्योजकता कौशल्य व ज्ञानात वाढ करणे , नवीन उद्योग व्यवसायात
वाढ होण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन, लाभार्थीच्या सोयीनुसार सॉफ्टवेअरच्या माध्यमातुन
मुक्त शिक्षणाद्वारे अभ्यास करण्याची सोय, तज्ञ सल्लागार यांचेकडुन मार्गदर्शन तसेच
स्वत:चा बिझनेस प्लॅन तयार करणे हे असुन यशस्वीरित्या अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या लाभार्थीना
उद्योजकता विकास संस्था (ई.डी.आय.आय.) अहमदाबाद यांचेमार्फत प्रमाणपत्र दिले जाणार
आहे. सदर पदविका अभ्यासक्रमाचे माध्यम हे इंग्रजी असुन या अभ्यासक्रमासाठी जानेवारी
, एप्रिल , जुलै किंवा ऑक्टोबर या महिन्यापासुन सुरु होणाऱ्या बॅचेससाठी नोंदणी करता
येत असुन सध्या एप्रिल-2017 च्या बॅचसाठी संपुर्ण
महाराष्ट्रात एमसीईडी कार्यालयात नोंदणी सुरु आहे. सदरील अभ्यासक्रमात लाभार्थीना एमसीईडीमार्फत
सल्लामसलत व मार्गदर्शनही केले जाणार आहे.
सदर पदविका ही विशेषत: व्यवस्थापनशास्त्र, वाणिज्य विज्ञान
व तंत्रज्ञान शाखेतील तसेच इतर कुढल्याही शाखेच्या पुर्ण वेळ पदविकाप्राप्त / पदवीच्या
शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थी / उद्योजकांसाठी उपयुक्त अभ्यासक्रमादरम्यान
विविध विषयाचे वाचन साहित्यही दिले जाणार आहे. ज्यामध्ये उद्योजकतेसंबंधी आवश्यक माहिती
उद्योगविषयक सहकार्य करणाऱ्या संबंधित संस्था व यंत्रणांची माहिती उद्योग संधी व उद्योग
संधी शोधाबाबतची माहिती, बाजारपेठ पाहणीबाबत माहिती उद्योग / व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
तयार करण्याबाबत माहिती, उद्योग व्यवस्थापन ,उद्योगसाठी आवश्यक परवाने / नोंदणी व ना
हरकत प्रमाणपत्र इत्यादी माहिती, तसेच उद्योगासंबंधी कायदेशीर बाबी अद्ययावत व्यवसाय
इत्यादीबाबत वाचन साहीत्य दिले जाणार आहे. सदरील पदविका अभ्यासक्रमाचे माहितीपत्रक
www.edii.org वर उपलब्ध आहे.
तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सदर पदविका अभ्यासक्रमाच्या
प्रवेशासाठी विहित नमुन्यातील अर्ज,दोन पासपोर्ट फोटो व शैक्षणिक प्रमाणपत्रसह महाराष्ट्रातील
कोणत्याही जिल्हयात एमसीईडी कार्यालय द्वारा- जिल्हा उद्योग केंद्र एस-12 जिल्हाधिकारी
कार्यालय हिंगोली येथे अरुण एम.कोंडेकर (भ्रमणध्वनी 8698770678/7722059442) यांच्याशी
संपर्क साधावा, असे आवाहन शिवाजीराव मुंढे व एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment