07 April, 2017

पोलीस पाटील भरती आरक्षणासंबंधीची बैठकीचे आयोजन
हिंगोली,दि.7: वसमत उपविभागातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यासाठी, पोलीस पाटील पदाचे आरक्षणासंबंधी बैठक दि. 11 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसील कार्यालय वसमत येथे उपविभागीय दंडाधिकारी वसमत यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. यासाठी वसमत / औंढा (ना.) तालुक्यातील सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, सर्व पंचायत समिती सदस्य, सर्व सरपंच, सर्व ग्राम पंचायत सदस्य, सर्व ग्रामसेवक, कार्यरत पोलीस पाटील, संबंधीत पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी या सर्वांनी नोंद घेऊन नियोजित वेळेवर तहसील कार्यालय, वसमत येथे उपस्थित राहावे.

***** 

No comments: