अनाधिकृत धार्मिक स्थळासंबंधी तक्रार
निवारण यंत्रणा कक्ष
हिंगोली,
दि. 13 : सार्वजनिक जागांवरील
अनाधिकृत धार्मिक स्थळांच्या संदर्भात मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल जनहित याचीका
क्र. 104/2010 प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि. 01 ऑक्टोबर, 2016 रोजी दिलेल्या निर्देशानुसार
कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले होते.
मा. उच्च न्यायालयाच्या दि. 01 ऑक्टोबर, 2016 रोजी
दिलेल्या आदेशानूसार महापालिका क्षेत्र वगळून सार्वजनिक जागांवरील अनाधिकृत धार्मिक
स्थळांच्या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय,
हिंगोली येथे तक्रार निवारण यंत्रणा उभारली असून तक्रार निवारण कक्षाचा दुरध्वनी क्र.
02456-221450, भ्रमणध्वनी Whats app क्रमांक 9011000933,
प्रशासकीय ई-मेल आयडी rdc.hingoli123.@gmail.com असा आहे.
अनाधिकृत धार्मिक स्थळांच्या संदर्भात कोणाचीही
काही तक्रार असल्यास वर नमूद केलेले दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी / Whats app क्रमांक 9011000933, प्रशासकीय ई-मेल आयडी rdc.hingoli123.@gmail.com नोंदविता येईल.
*****
No comments:
Post a Comment