महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
हिंगोली
दि. 29 :- राज्याचे
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप
व पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे
हे दि. 30
एप्रिल, 2017 व दि. 01 मे, 2017 रोजी
हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
रविवार दि. 30 एप्रिल, 2017 रोजी दुपारी 4.30
वाजता औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने जालना-जिंतूर मार्गे हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 8.00
वाजता शासकीय विश्रामगृह
हिंगोली येथे आगमन व मुक्काम.
सोमवार दि. 01 मे, 2017 रोजी सकाळी 8.00 वाजता महाराष्ट्र
राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण (स्थळ : पोलीस परेड ग्राऊंड,
हिंगोली). सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक.
सोयीनुसार हिंगोली येथे बॅडमिंटन हॉलचे भूमीपूजन. सायंकाळी 4.30 वाजता हिंगोली येथून
वाहनाने सिरसमकडे प्रयाण. सायंकाळी 4.55 वाजता सिरसम ता. हिंगोली येथे आगमन. सायंकाळी
5.00 वाजता सिरसम ता. हिंगोली येथे जाहिर सभा. सायंकाळी 7.00 वाजता वाहनाने वारंगा
फाटा ता. कळमनुरी जि. हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 8.00 वाजता वारंगा येथे आगमन. रात्री
8.10 वाजता तीर्थ महावन बुध्दविहार सातवाहन भूमी, वारंगा फाटा, ता. कळमनुरी जि. हिंगोली
येथे भारतभ्रमण भिक्खू संघाच्या वतीने बुध्दमूर्तीची प्रतिष्ठापणा (संपर्क : भदंत शासनक्रांती
महास्थवीर, मो. 8454096480). रात्री 9.30 वाजता वारंगा ता. कळमनुरी जि. हिंगोली येथून
शासकीय वाहनाने जिंतूर (जि. परभणी) - जालना-औरंगाबाद-अहमदनगर मार्गे पुणेकडे प्रयाण
करतील.
*****
No comments:
Post a Comment