अधिकारी / कर्मचारी यांनी कर्तव्य व जबाबदाऱ्या ओळखून कर्तव्य पार पाडावीत
--- निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड
हिंगोली,दि. 20: - प्रत्येक विभागाच्या अधिकारी , कर्मचाऱ्यांनी आपआपली कर्तव्य व जबाबदाऱ्या
ओळखून कर्तव्य पार पाडावीत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नागरी सेवा दिन-2017 साजरा करण्यात आला त्यानिमित्त झालेल्या सोहळ्यात निवासीउपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. देशपांडे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. पारवेकर , नायब तहसीलदार रघुनाथ मिटकरी, श्री. सुनिल कावरखे, ॲड. अरगडे आदि विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती. तसेच विविध विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी , कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.
नागरी सेवा दिनाच्या शुभेच्छा देऊन ॲड. अरगडे म्हणाले की , अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या अधिकाराचा वापर अधिक लोकाभिमुखपणे करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला मिळालेला अधिकार हा जनतेच्या सेवेकरिता आहे. त्यांच्यापर्यंत सेवा पोहोचविणे आपले कर्तव्य आहे, ही भावना प्रत्येकात रुजली पाहिजे. प्रशासनाविषयी जनतेत आदर असायला पाहिजे. लोकाभिमुख प्रशासनासह ते पारदर्शकदेखील असणे आवश्यक आहे. जनतेसाठीच प्रशासन असल्याने पारदर्शकतेला महत्त्व आहे, आपली जिथे नियुक्ती केली तिथे त्यांनी चांगले काम करुन दाखविले पाहिजे, असे आवाहनही ॲड. अरगडे केले.
नायब तहसीलदार रघुनाथ मिटकरी यांनी सुत्रसंचालन व प्रास्ताविक केले.
नागरी सेवा दिन-2017 शासनाचे सत्कारमूर्ती अधिकारी / कर्मचारी : विशेष अधिकारी समाज कल्याण श्रीमती जी. डी. गुठ्ठे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग वसमत डी.एस. देवतराज, शाखा अभियंता डी. आर. धाडवे, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी कार्यालयाचे सांख्यिकी सहाय्यक ओमप्रकाश टिक्कस, नायब तहसील राजेंद्र गळगे, सुनिल कावरखे, शासकीय तंत्र निकेतन हिंगोलीचे अधिव्याख्याता यंत्र ए. आर. लोळगे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिल्पनिर्देशक एस. एम. राका आदि अधिकारी / कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले .
****
No comments:
Post a Comment