31 March, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 174 रुग्ण ; तर 128 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  761 रुग्णांवर उपचार सुरु तर सहा रुग्णांचा मृत्यू

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 31 : जिल्ह्यात 174 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 10, वसमत परिसर 29 व्यक्ती, कळमनुरी परिसर 02 व्यक्ती, औंढा परिसर 16 व्यक्ती व सेनगाव परिसर 35 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 25 व्यक्ती, वसमत परिसर 26 व्यक्ती, कळमनुरी परिसर 19 व्यक्ती, सेनगाव परिसर 06 व्यक्ती, औंढा परिसर 06 व्यक्ती असे एकूण 174 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 128 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सहा कोरोनोबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 104 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 15 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 119 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 6 हजार 567 रुग्ण झाले असून, त्यापैकी  5 हजार 716 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 761 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 90 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 

सेनगाव पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीसाठी 16 एप्रिल रोजी विशेष सभेचे आयोजन

 


हिंगोली, (जिमाका) दि. 31 : सेनगाव येथील पंचायत समितीच्या सभापतींनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे  सभापती पंचायत समिती , सेनगाव हे पद रिक्त झाल्यामुळे नवीन सभापतीची निवड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 59 (3) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी  यांनी  सभापती पदाची  निवडणूक घेण्यासाठी  दि. 16 एप्रिल, 2021 रोजी दुपारी 2.00 वाजता पंचायत समितीची विशेष सभा घेण्यासाठी  पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, हिंगोली  यांना प्राधिकृत केले आहे.

उपरोक्त पीठासीन अधिकारी  हे सभापती पदाच्या निवडणुकीसाठीचे नामनिर्देशन पत्रे दि. 16 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत पंचायत समिती सेनगाव कार्यालयाच्या सभागृहात स्वीकारतील.

या विशेष सभेत पंचायत समिती सभापती  पदासाठीची निवडणूक ही महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 व त्या अंतर्गत महाराष्ट्र जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समिती उपसभापती पदाचे आरक्षण व निवडणूक नियम 1962 च्या तरतुदीनुसार घेण्यात यावी. पीठासीन अधिकारी यांनी उक्त पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना या विशेष सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी विहित नमुन्यातील नोटीस सदस्यांना वेळेत बजावणीसाठी विशेष दुतामार्फत व्यवस्था करावी आणि या बैठकीनंतर निवडून आलेल्या सभापती यांची नावे व पत्ता सभेच्या कार्यवृत्तांच्या प्रतीसह जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे, असे आदेश दिले आहेत.

****

भारत-चीन, पाकिस्तान युध्दामध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेल्या व निवृत्तीवेतन मिळत नसलेल्या माजी सैनिकांनी 10 एप्रिलपर्यंत नोंद करण्याचे आवाहन

 


 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 31 :  जिल्ह्यातील ज्या माजी सैनिकांनी 1962, 1965 आणि 1971 च्या भारत-चीन , पाकिस्तान युध्दामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते व निवृत्ती वेतन मिळत नाही अशा माजी सैनिकांनी त्यावेळचा पुरावा सोबत घेऊन दिनांक 10 एप्रिल, 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे नोंद करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

**** 

30 March, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 224 रुग्ण ; तर 91 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  721 रुग्णांवर उपचार सुरु तर दोन रुग्णांचा मृत्यू

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 30 : जिल्ह्यात 224 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 37, वसमत परिसर 31 व्यक्ती, कळमनुरी परिसर 35 व्यक्ती, औंढा परिसर 13 व्यक्ती व सेनगाव परिसर 04 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 62 व्यक्ती, वसमत परिसर 21 व्यक्ती, कळमनुरी परिसर 13 व्यक्ती, सेनगाव परिसर 05 व्यक्ती, औंढा परिसर 03 व्यक्ती असे एकूण 224 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 91 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज दोन कोरोनोबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 60 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 10 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 70 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 6 हजार 393 रुग्ण झाले असून, त्यापैकी  5 हजार 588 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 721 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 84 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 

26 March, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 186 रुग्ण ; तर 65 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  627 रुग्णांवर उपचार सुरु तर एका रुग्णाचा मृत्यू

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : जिल्ह्यात 186 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 19 व्यक्ती, कळमनुरी परिसर 29 व्यक्ती, वसमत परिसर 11 व्यक्ती, औंढा परिसर 07 व्यक्ती व सेनगाव परिसर 03 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 33 व्यक्ती, कळमनुरी परिसर 21 व्यक्ती, वसमत परिसर 14 व्यक्ती, औंढा परिसर 12 व्यक्ती व सेनगाव परिसर 37 व्यक्ती  व्यक्ती असे एकूण 186 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 65 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  तर आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 50 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 07 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 57 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 5 हजार 879 रुग्ण झाले असून, त्यापैकी  5 हजार 173 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 627 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 79 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 

 

 

 

ग्राम बाल संरक्षण समितीच्या सक्षमीकरणासाठी सेनगाव व वसमत येथे तालुकानिहाय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 


हिंगोली, (जिमाका) दि. 26 : जिल्ह्यात महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत असलेल्या जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत गावनिहाय स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीच्या सक्षमीकरणासाठी दि. 25 मार्च, 2021 रोजी सेनगाव येथे व आज दि. 26 मार्च, 2021 रोजी वसमत येथे तालुकानिहाय ग्राम बाल संरक्षण समिती  प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली .

हे प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सभागृह सेनगाव व वसमत येथे आयोजित करण्यात आले होते. सेनगाव येथील प्रशिक्षण कार्यशाळेस सेनगावचे गटविकास अधिकारी एस.आ. बेले, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रतिनिधी  पठाण, विस्तार अधिकारी पंचायत श्री. कोकाटे हे उपस्थित होते. तर वसमत येथील प्रशिक्षण कार्यशाळेस वसमतचे गटविकास अधिकारी तानाजी गंगारामजी भोसले, सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी बळीराम पाटील, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एस. के. सोरेकर, सहायक गटविकास अधिकारी बाबूलाल शिंदे उपस्थित होते.

या प्रशिक्षणास अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी  ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्व व कामकाज या बाबत माहिती दिली तर बाल विवाह बद्दलची माहिती बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गणेश मोरे यांनी दिली. बाल संरक्षण विषयक यंत्रणेची माहिती बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीब पठाण यांनी  दिली. बाल लैंगिक या विषयीची माहिती कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत दिली. बालकांचे हक्क व अधिकार याविषयीची माहिती सामाजिक कार्यर्त्या रेश्मा पठाण व समुपदेशक सचिन पठाडे यांनी दिली. तसेच ग्राम बाल संरक्षण समिती कामकाज विषयक चित्रफितीचे प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, डाटा एंट्री ऑपरेटर राहूल सिरसाट व बाह्य क्षेत्रकार्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी केले.

*****

 

कोरोना आजारावर नियंत्रण आणण्यासाठी तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समन्वय समिती गठीत

 


हिंगोली, (जिमाका) दि. 26 : शहरात तसेच ग्रामीण भागात मागील दोन महिन्यापासून कोविड-19 बाधित रुग्णांची संख्या जलद गतीने वाढत आहे. कोविड-19 या आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आणून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी हिंगोली शहरात व ग्रामीण भागात विविध उपाययोजना  करणे आवश्यक  आहे. त्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून तहसील कार्यालयाकडून दि. 27 फेब्रुवारी, 2021 च्या आदेशान्वये कोविड-19 बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन (contract tress) त्यांचे विलगीकरण करण्यासाठी एकूण 16 पथके नेमली आहेत.

          कोविड-19 आजाराचे गांभीर्य लक्षात घेता तसेच वाढती रुग्णसंख्या पाहता या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी पुढील प्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करणे. सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळणे. सामाजिक अंतर राखणे. धार्मिक, प्रार्थना, पर्यटन स्थळांवर प्रवेश बंद करणे. फळभाजी विक्रेते, किराणा दुकान व बाजारपेठेतील इतर दुकाने येथे होणारी आनावश्यक गर्दी यावर देखरेख/नियंत्रण ठेवणे. शहरातील व ग्रामीण भागातील दुकाने, आस्थापना, प्रतिष्ठान इत्यादींना नेमून दिलेल्या वेळेतच चालू ठेवतात याची खबरदारी घेणे. मंगल कार्यालये, लॉन्स इत्यादी ठिकाणी लग्नसमारंभात दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक नागरिक असणार नाहीत याची देखरेख व नियंत्रण ठेवणे. शाळा, कोचींग क्लासेस, जिमखाने, हॉटेल्स, उपहारगृहे, पानटपऱ्या इत्यादींना नेमून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त चालू न ठेवणे व त्या ठिकाणी आरोग्य विषयक सुविधा (मास्क/सॅनिटायझर) याचा वापर होत आहे का नाही याची पाहणी करणे. कोविड-19 बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविणे. कोविड-19 सदृश्य नागरिकांची तपासणी करणे इत्यादी व अनुषंगिक बाबीचा समावेश आहे .

                वरील सर्व बाबींच्या उपाययोजना करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, नियंत्रण ठेवणे व अनुषंगिक कामांसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका इंन्सिडंट कमांडर पांडुरंग माचेवाड यांनी तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समिती गठीत केली आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

           कोविड-19 तालुकास्तरीय समन्वय समिती : या समितीवर अध्यक्ष म्हणून तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांची तर सदस्य सचिव म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एन. व्ही. कारेडे यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये सदस्य म्हणून गटविकास अधिकारी मिलींद पोहरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे, हिंगोली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कच्छवे, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बंदखडके, बासंबा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मलपिल्लू, नरसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गिरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.  

          वरील कोविड-19 तालुकास्तरीय समन्वय समिती यांच्या अधिनस्त उपरोक्त नमूद कामे करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती पुढील प्रमाणे गठीत करण्यात आली असून प्रत्येक विभागाने त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांची त्यांच्यास्तरावर स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करुन नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

           कोविड-19 ग्रामस्तरीय समन्वय समिती : कोविड-19 संदर्भात गाव पातळीवर सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संबंधित गावचे तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समन्वय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये संबंधित गावचे ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी (बिट जमादार व पोलीस कॉन्स्टेबल), कृषि सहाय्यक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व कोतवाल यांची नेमणूक करण्यात आली आहे.

           वरील प्रमाणे ग्रामस्तरीय समितीमध्ये नियुक्त सर्व संबंधित कर्मचारी यांनी कोविड-19 संदर्भात आदेशात नमूद केल्याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच त्यांनी केलेल्या दैनंदिन कामाचा अहवाल वेळोवेळी त्याच्या कार्यालय प्रमुखांकडे सादर करावयाचा आहे.

           वरील नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत संबंधित प्रभागाचे नगर परिषद सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे सदरील पथकाचे सदस्य असून त्यांनी उक्त कामी पूर्णपणे सहकार्य करावे. वरीलप्रमाणे नियुक्त पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवावा. या आदेशात नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना सॅनेटायझर, मास्क, ग्लोज व इतर आरोग्य विषयक साहित्य तालुका आरोग्य अधिकारी, हिंगोली व जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली यांनी उपलब्ध करुन देण्यात यावे. तसेच पथकातील नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण तात्काळ करावे.

          या आदेशाची अवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, पथकातील सदस्याने भारतीय दड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल तसेच या कामी हयगय, टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा केल्यास संबंधितावर साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम 2020 मधील तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार हिंगोली यांनी आदेशाद्वारे कळविले आहे.

*****

 

कोणत्याही लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरीत होणार नाही दक्षता घेण्याचे तहसीलदारांना आदेश

 


 

हिंगोली, (जिमाका) दि. 26 : माहे मार्च-एप्रिल 2021 या कालावधीतील हिंगोली जिल्ह्यासाठी मिळणाऱ्या धान्यामधील मक्याच्या दर्जाबाबत झालेल्या तक्रारीच्या व वृत्तपत्रातील बातमीच्या अनुषंगाने सर्व तहसीलदार यांचा अभिप्राय मागविण्यात आला होता. तहसीलदार यांनी कळविल्यानुसार तहसील गोदामामध्ये निकृष्ट दर्जाचा मका आढळून आलेला नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.

परंतु वसमत गोदामामध्ये 10 ते 12 बॅग हे थोडे पीठ असल्याप्रमाणे आढळून आलेले आहेत. याबाबत  तहसीलदार वसमत यांनी सदर धान्य हे चाळणी करुन लाभार्थ्यांना वाटप करणे योग्य होईल, असे कळविले आहे.

कोणत्याही लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरीत होणार नाही या बाबत दक्षता घेण्यासाठी सर्व तहसीलदारांना  कळविले असल्याचेही  जिल्हा पुरवठा अधिकारी  यांनी  प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे .

****

25 March, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 56 रुग्ण ; तर 94 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  507 रुग्णांवर उपचार सुरु तर दोन रुग्णांचा मृत्यू

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 25 : जिल्ह्यात 56 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 13 व्यक्ती, कळमनुरी परिसर 16 व्यक्ती, वसमत परिसर 16 व्यक्ती, औंढा परिसर 08 व्यक्ती व सेनगाव परिसर 02 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे औंढा (ना.) परिसर 01 व्यक्ती असे एकूण 56 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 94 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  तर आज दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 40 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 06 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 46 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 5 हजार 693 रुग्ण झाले असून, त्यापैकी  5 हजार 108 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 507 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 78 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 

 

 

24 March, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 139 रुग्ण ; तर 80 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  547 रुग्णांवर उपचार सुरु तर एका रुग्णांचा मृत्यू

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात 139 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 08 व्यक्ती, कळमनुरी परिसर 31 व्यक्ती, वसमत परिसर 13 व्यक्ती, औंढा परिसर 07 व्यक्ती व सेनगाव परिसर 04 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 47 व्यक्ती, वसमत परिसर 17 व्यक्ती , कळमनुरी परिसर 07 व्यक्ती व औंढा (ना.) परिसर 05 व्यक्ती असे एकूण 139 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 80 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  तर आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 40 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 05 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 45 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 5 हजार 637 रुग्ण झाले असून, त्यापैकी  5 हजार 14 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 547 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 76 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****