17 March, 2021

कोविड-19 या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण असलेल्या घरावर गृहविलगीकरणाचे स्टीकर लावण्यासाठी कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती

 


हिंगोली, (जिमाका) दि. 17 : राज्यात तथा जिल्ह्यात कोविड-19 या विषाणूजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यात आज रोजी कोविड-19 रुग्णासाठी उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या लक्षात घेता तसेच कोविड आजाराच्या रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता कोविड-19 या विषाणूजन्य आजाराचा उपचार घेऊन परत आलेल्या रुग्णास गृहविलगीकरण देखरेखीखाली ठेवण्यात येते.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोविड-19 या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण असलेल्या घरावर गृहविलगीकरणाचे स्टीकर लावण्यासाठी खालील कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती केली आहे.

हिंगोली शहरासाठी येथील जिल्हा क्षयरोग कार्यालयातील आरोग्य सहायक एम.यु. देशपांडे (मो. 9552058684), एस. एम. डुकरे (मो. 8275918136), कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयातील अवैद्यकीय सहायक पी. एस. जटाळे (मो.9822938419), भांडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कुष्ठरोग तंत्रज्ञ रविंद्र भालेराव, औंढा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील पीएमडब्ल्यू भगतसिंग पथरोड यांची प्रतिनियुक्ती केली आहे.

वसमत शहरासाठी वसमत उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवक ओ. आर. स्वामी (मो.8275108145),  डी. एच. भांजे (मो. 9011238424), वसमत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कुष्ठरोग तंत्रज्ञ संजय जाधव यांची प्रतिनियुक्ती केली आहे.

कळमनुरी शहरासाठी कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवक बी. एस. मुकाडे, डी.पी. पंधरे (मो. 9850255280), बी. के. मस्के (मो. 9588400104) यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.

औंढा नगर पंचायतसाठी सुरेगाव उपकेंद्रातील आरोग्य सेवक बी. आर. कुटे ( मो. 8888196091), गोळेगाव उपकेंद्रातील आरोग्य सेवक पी.बी. देवकते (मो. 9011328674) यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. तर सेनगांव नगर पंचायतसाठी सेनगाव उपकेंद्रातील आरोग्य सेवक एस.एस. बोरबळे (मो. 9011291555), कापडसिंगी उपकेंद्रातील आरोग्य सेवक एम.एच.पोले (मो. 7507438931) यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात कोविड-19 या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण ज्या घरी आहेत त्या ठिकाणी गृहविलगीकरणाचे स्टीकर लावून नेमून दिलेल्या कालावधीमध्ये संबंधित रुग्णांच्या आजाराबाबत दैनंदिन अहवालाची नोंद दिलेल्या प्रपत्रता करण्यात यावी.

तसेच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व उपकेंद्रस्तरावर कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचारी यांच्यावर कोविड-19 या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण असलेल्या घरावर गृहविलगीकरणाचे स्टीकर लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच आपण तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज पहावे.

या कामी कुठल्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी. दिंरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास आपणाविरुध्द भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1857 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

****** 

 

 

No comments: