हिंगोली, (जिमाका) दि. 18 : राज्यात तसेच
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी शासनाने व
जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य
आहे. परंतु वारंवार सूचना देऊनही जिल्ह्यातील काही व्यापारी, दुकानदार तसेच नागरिक
हे कोरोना नियमांचे व सामाजिक अंतराचे पालन करत नसल्याचे तसेच मास्कचा वापर करत
नसल्याचे देखील निदर्शनास आले आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता
नाकारता येत नाही.
त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना नियमांचे, सामाजिक
अंतराचे पालन न करणाऱ्या तसेच मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिक तसेच व्यापारी,
दुकानदार यांच्याविरुध्द कार्यवाही करण्यासाठी शहरी भागासाठी मुख्याधिकारी , नगर
परिषद/नगर पंचायत आणि ग्रामीण भागासाठी
गटविकास अधिकारी , पंचायत समिती यांच्यावर सोपविली आहे. ही कार्यवाही पोलीस विभागाच्या
समन्वयाने करण्याचे व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेश
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दिले
आहेत .
******
No comments:
Post a Comment