हिंगोली, (जिमाका)
दि. 26 : जिल्ह्यात
महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत असलेल्या जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत
गावनिहाय स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल संरक्षण समितीच्या सक्षमीकरणासाठी दि.
25 मार्च, 2021 रोजी सेनगाव येथे व आज दि. 26 मार्च, 2021 रोजी वसमत येथे
तालुकानिहाय ग्राम बाल संरक्षण समिती
प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली .
हे प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा महिला व बालविकास
अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सभागृह सेनगाव व वसमत
येथे आयोजित करण्यात आले होते. सेनगाव येथील प्रशिक्षण कार्यशाळेस सेनगावचे
गटविकास अधिकारी एस.आ. बेले, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णदेव पाटील, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे
प्रतिनिधी पठाण, विस्तार अधिकारी पंचायत श्री.
कोकाटे हे उपस्थित होते. तर वसमत येथील प्रशिक्षण कार्यशाळेस वसमतचे गटविकास
अधिकारी तानाजी गंगारामजी भोसले, सहायक पोलीस निरीक्षक श्रीदेवी बळीराम पाटील,
एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एस. के. सोरेकर, सहायक गटविकास अधिकारी बाबूलाल
शिंदे उपस्थित होते.
या प्रशिक्षणास अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील
यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती
कोरडे यांनी ग्राम बाल संरक्षण समितीचे
महत्व व कामकाज या बाबत माहिती दिली तर बाल विवाह बद्दलची माहिती बाल संरक्षण
अधिकारी संस्थात्मक गणेश मोरे यांनी दिली. बाल संरक्षण विषयक यंत्रणेची माहिती बाल
संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीब पठाण यांनी
दिली. बाल लैंगिक या विषयीची माहिती कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा
पंडीत दिली. बालकांचे हक्क व अधिकार याविषयीची माहिती सामाजिक कार्यर्त्या रेश्मा
पठाण व समुपदेशक सचिन पठाडे यांनी दिली. तसेच ग्राम बाल संरक्षण समिती कामकाज
विषयक चित्रफितीचे प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, डाटा एंट्री
ऑपरेटर राहूल सिरसाट व बाह्य क्षेत्रकार्य कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांनी
केले.
*****
No comments:
Post a Comment