हिंगोली,
(जिमाका) दि. 01 : राज्यात तसेच जिल्ह्यात कोविड-19 बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस
वाढ होत असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण हिंगोली
जिल्ह्यात 7 दिवस संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान दूध विक्री केंद्रे
(दूध डेअरी) यांना त्यांची केंद्रे उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु अशा
ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाचे अध्यक्ष रुचेश जयवंशी यांनी दूध विक्री केंद्रांच्या वेळा निश्चित केल्या
आहेत.
जिल्ह्यात
संचारबंदीच्या काळात दूध विक्री केंद्राच्या (दूध डेअरी) ठिकाणी गर्दी होऊ नये
म्हणून जिल्ह्यातील दूध विक्री केंद्रे (दूध डेअरी) सकाळी 7.00 ते सकाळी 9.00 व
सायंकाळी 7.00 ते रात्री 9.00 या कालावधीत उघडण्यास परवानगी
देण्यात आली आहे. या दरम्यान शासन स्तरावरुन कोरोनाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या
नियमांचे पालन करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, केंद्रावर येणाऱ्या व्यक्तींनी तसेच
केंद्र चालकांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. दूध विक्री केंद्राचे व साहित्याचे
वेळोवेळी सॅनिटराईझ (Sanitization) करण्याची केंद्र
चालकांनी दक्षता घ्यावी.
या आदेशाची
आवज्ञा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये
शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व आपत्ती व्यवस्थापन कायदा
2005, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020
अंतर्गत संबंधितावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment