हिंगोली,
(जिमाका) दि. 23 : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी
खाजगी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य
विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत एस-3, दुसरा
माळा, हिंगोली यांच्या विद्यमाने दि. 24 मार्च, 2021 पर्यंत ऑनलाईन पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे
आयोजन केले आहे.
या मेळाव्यास
नवभारत फर्टीलायझर प्रा.लि. औरंगाबाद, समस्था
मायक्रोफायनान्स सोलापूर या उद्योजकांनी सहभाग नोंदविला असून त्यांना पुढीलप्रमाणे
पदे भरावयाची आहेत. यामध्ये सेल्स रिप्रझेंटेटिव्ह, कस्टमर रिलेशनशिप ऑफीसर या
पदाचा समावेश आहे. या रोजगार मेळाव्यास सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ‘Employment/रोजगार’
या पर्यायावर क्लिक करुन ‘Job seeker/नोकरी साधक’ हा पर्याय निवडावा, युजर आयडी व
पासवर्डद्वारे लॉग ईन करुन प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या
पर्यायाद्वारे हिंगोली जिल्हा निवडून रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अर्ज करावे.
दहावी पास किंवा
त्यापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता, अभियांत्रिकी पदवी व आयटीआय पास उमेदवारांनी या
मेळाव्यास ऑनलाईन सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
विभागाचे सहायक आयुक्त प्र.सो.खंदारे यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment