हिंगोली,
(जिमाका) दि. 31 : सेनगाव येथील पंचायत समितीच्या सभापतींनी
पदाचा राजीनामा दिल्यामुळे सभापती पंचायत समिती
, सेनगाव हे पद रिक्त झाल्यामुळे नवीन सभापतीची निवड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा
परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 59 (3) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी यांनी सभापती पदाची
निवडणूक घेण्यासाठी दि. 16 एप्रिल,
2021 रोजी दुपारी 2.00 वाजता पंचायत समितीची विशेष सभा घेण्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, हिंगोली यांना प्राधिकृत केले आहे.
उपरोक्त पीठासीन
अधिकारी हे सभापती पदाच्या निवडणुकीसाठीचे
नामनिर्देशन पत्रे दि. 16 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत
पंचायत समिती सेनगाव कार्यालयाच्या सभागृहात स्वीकारतील.
या विशेष सभेत
पंचायत समिती सभापती पदासाठीची निवडणूक ही
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 व त्या अंतर्गत महाराष्ट्र
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समिती उपसभापती
पदाचे आरक्षण व निवडणूक नियम 1962 च्या तरतुदीनुसार घेण्यात यावी. पीठासीन अधिकारी
यांनी उक्त पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना या विशेष सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी
विहित नमुन्यातील नोटीस सदस्यांना वेळेत बजावणीसाठी विशेष दुतामार्फत व्यवस्था करावी
आणि या बैठकीनंतर निवडून आलेल्या सभापती यांची नावे व पत्ता सभेच्या कार्यवृत्तांच्या
प्रतीसह जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे, असे आदेश दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment