हिंगोली, (जिमाका) दि. 17 : राज्यात तथा जिल्ह्यात कोविड-19 या विषाणूजन्य
आजाराच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये महिला रुग्णांची
संख्या सुध्दा बऱ्याच प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी
महिला कोरोना केअर सेंटर, अल्पसंख्यांक मुलींचे वसतीगृह, औढा ना. रोउ, लिंबाळा
मक्ता ता.जि. हिंगोली येथे दि. 16 मार्च ते 22 मार्च, 2021 या कालावधीसाठी समुदाय
आरोग्य अधिकारी यांची प्रतिनियुक्ती केल्या आहेत. प्रतिनियुक्ती करण्यात आलेल्या
समुदाय आरोग्य अधिकारी यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
समुदाय आरोग्य
अधिकारी म्हणून कडती उपकेंद्रातील डॉ.वैष्णवी कापसे (मो.नं. 9011126594), डिग्रस
कऱ्हाळे उपकेंद्रातील डॉ. संगिता टार्फे (8975175725), भटसावंगी उपकेंद्रातील डॉ.
रुपाली मकासरे (मो.नं. 8806174934), जांभरुन तांडा उपकेंद्रातील डॉ. मंजुषा
कऱ्हाळे ( 7507801259), रहोली उपकेंद्रातील डॉ. सय्यद आलीया समरीन (मो.नं.
7744038468), लोहगांव उपकेंद्रातील डॉ. संता शंकर कऱ्हाळे (मो.नं. 7350074047)
यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
वरील सर्व समुदाय
आरोग्य अधिकारी यांनी डॉ. विठ्ठल करपे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय,
हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली काम पहावे. या कामी कुठल्याही प्रकारची दिरंगाई
होणार नाही याची दक्षता घ्यावी. दिंरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास आपणाविरुध्द
भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1857 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये
कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.
*****
No comments:
Post a Comment