22 March, 2021

जिल्ह्यात तीन बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश

 


                                                        

हिंगोली, (जिमाका) दि. 22 : हिंगोली, (जिमाका) दि. 22 : जिल्ह्यातील मौजे दगड पिंपरी , मौजे सेलु ता. वसमत व मौजे सापळी ता. कळमनुरी  जि. हिंगोली येथील अल्पवयीन मुलीचे बाल विवाह लावून दिले जात असल्याची तक्रार चाईल्ड लाईनला व पोलीस प्रशासनास मिळाली असता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार चाईल्ड लाईन व पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे मार्च-2021 मध्ये लॉकडाऊन काळातही हिंगोली  जिल्ह्यात एकाच आठवड्यात वरील तीन गावातील सलग 03 बाल विवाह रोखण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षास यश आले आहे.

जिल्ह्यामध्ये तीन बाल विवाह होत असल्याची चाहुल चाईल्ड लाईन मार्फत लागताच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत, बाल संरक्षण अधिकारी गणेश मोरे, संस्थाबाह्य बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रेश्मा पठाण, रामप्रसाद मुडे, पोलीस प्रशासन व चाईल्ड लाईन यांच्या समन्वयाने वरील गावातील ग्रामबाल संरक्षण समिती, अंगणवाडी सेविका व ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्या मदतीने बाल विवाह रोखण्यात आले आणि बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. या गुन्ह्यात एक लाख रुपये दंड व दोन वर्ष सक्त मजुरीची  शिक्षा अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

 बाल विवाहाच्या दुष्परिणामाविषयी समुपदेशन करण्यात आले व ग्राम बालसंरक्षण समिती समक्ष मुलीचे वय वर्ष 18 पूर्ण होईपर्यंत लग्न करु नये असा लेखी जबाब बालिकेच्या कुटुंबियांकडून लिहून घेण्यात आले व हे बाल विवाह रोखण्यात आले.

तसेच दि. 16 मार्च, 2021 रोजी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक एस. एस. घेवारे यांच्या कडून बाल विवाह होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली असता जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गणेश मोरे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेश्मा पठाण व चाईल्ड् लाईन टीम मेंबर हिंगोली यांनी घटनास्थळी धाव घेतली असता बाल विवाह झाला असल्याचे निर्देशनास आले. त्यानंतर या बालिकेविषयी सविस्तर विचारपूस केली असता ती सेनगाव तालुक्यातील हत्ता या गावची असल्याचे समजले. हे घटनास्थळ हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यामध्ये असल्याकारणाने येथील पोलीस यंत्रणा, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व ग्रामसेवक यांनी या बालविवाह संदर्भातील व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी दिली आहे.

*****

No comments: