हिंगोली, (जिमाका) दि. 12 : जिल्ह्यात 49 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची
माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन
टेस्टद्वारे हिंगोली परिसर 04 व्यक्ती, कळमनुरी परिसर 09 व्यक्ती व सेनगाव परिसर 01
व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 14 व्यक्ती, वसमत परिसर 04 व्यक्ती,
सेनगाव परिसर 10 व्यक्ती व कळमनुरी परिसर 07 व्यक्ती असे एकूण 49 कोविड-19
पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 28 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील
आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 22 रुग्णांची
प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 03 कोविड-19 रुग्णांची
प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे
आज रोजी एकूण 25 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत
त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 4 हजार 645
रुग्ण झाले असून, त्यापैकी 4 हजार 149 रुग्ण बरे झाल्याने त्यांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 431 रुग्णांवर उपचार सुरु
आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 65 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment