हिंगोली, (जिमाका) दि. 17 : कळमनुरी तालुक्यातील माळेगाव
येथील मंगेश ससे यांच्या किराणा समोरील भाग, चिखली येथील विजय किराणा ते मळ
पर्यंतचा भाग, आखाडा बाळापूर येथील हेमंत खोकले यांचे घर ते शामराव बोंढारे यांचे
घर व सुरेश पंडीत यांचे घर, कृष्णापूर येथील नवीन आबादी, वारंगा मसाई येथील मसाई
मंदीर परिसर, वारंगा फाटा येथील गोपाल कदम यांचे घर ते मारोती मंदीर परिसर,
डोंगरकडा येथील नंदू परदापुरे यांचे घर ते संतोष साळवे यांचे घर, येलकी येथील
सरपंच गल्ली, कसबे धावडा येथील सुभाष खिल्लारे यांचे घर ते अशोक खिल्लारे यांचे
घर, बोल्डा स्टेशन येथील गोकुळ विद्यालय परिसर भागात कोविड-19 चे रुग्ण आढळून आले
आहेत. त्यामुळे या रोगाचा फैलाव इतरत्र होऊ नये म्हणून वरील गावाचे संपूर्ण क्षेत्र
हे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या
परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना
आवश्यक त्या सेवा ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45
ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची
नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment