हिंगोली,
(जिमाका) दि. 22 : येथील पंचायत समितीच्या उपसभापती यांनी पदाचा राजीनाम
दिल्यामुळे उपसभापती पंचायत समिती , हिंगोली
हे पद रिक्त झाल्यामुळे नवीन उपसभापती यांची निवड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा
परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी उपसभापती
पदाची निवडणूक घेण्यासाठी दि. 5 एप्रिल,
2021 रोजी दुपारी 2.00 वाजता पंचायत समितीची विशेष सभा घेण्यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, हिंगोली
यांना प्राधिकृत केले आहे.
उपरोक्त पीठासीन
अधिकारी हे उपसभापती पदाच्या निव्डणुकीसाठीचे नामनिर्देशन पत्रे दि. 5 एप्रिल,
2021 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत पंचायत समिती हिंगोली कार्यालयाच्या
सभागृहात स्वीकारतील.
या विशेष सभेत
पंचायत समिती उपसभापती पदासाठीची निवडणूक ही
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 व त्या अंतर्गत महाराष्ट्र
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समिती उपसभापती
पदाचे आरक्षण व निवडणूक नियम 1962 च्या तरतुदीनुसार घेण्यात यावी. पीठासीन अधिकारी
यांनी उक्त पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना या विशेष सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी
विहित नमुन्यातील नोटीस सदस्यांना वेळेत बजावणीसाठी विशेष दुतामार्फत व्यवस्था करावी
आणि या बैठकीनंतर निवडून आलेल्या उपसभापती यांची नावे व पत्ता सभेच्या कार्यवृत्तांच्या
प्रतीसह जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावे, असे आदेश दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment