हिंगोली, (जिमाका) दि. 24 : जिल्ह्यात महिला व बाल विकास कार्यालय अंतर्गत असलेल्या
जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत गावनिहाय स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल
संरक्षण समितीच्या सक्षमीकरणासाठी औढा (ना.) येथे आज तालुकानिहाय ग्राम बाल
संरक्षण समिती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
झाले.
हे प्रशिक्षण
कार्यक्रम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत
समिती सभागृह औंढा (ना.) येथे आज आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण
कार्यक्रमात एकात्मिक बाल विकास प्रकल्प
अधिकारी नैना पाटील, पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. मुंढे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे,
बालसंरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य )
जरीब खान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत, सामाजिक कार्यकर्त्या
रेश्मा पठाण, रामप्रसाद मुडे, समुपदेशक सचिन पठाडे, डाटा एन्ट्री ऑपरेटर राहुल
सिरसाट, बाह्य क्षेत्रीय कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत इत्यादींनी या
प्रशिक्षण कार्यशाळेत बालसंरक्षणाच्या दृष्टीने असलेले विविध कायदे व गाव बाल
संरक्षण समितीच्या जबाबदाऱ्या तसेच बालकांच्या सुरक्षिततेविषयी सविस्तर मार्गदर्शन
केले.
या प्रशिक्षणास
अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा बाल
संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी ग्राम
बाल संरक्षण समितीचे महत्व व कामकाज या बाबत माहिती दिली तर बालकांचे हक्क व
अधिकार या विषयी समुपदेशक सचिन पठाडे यांनी माहिती दिली. बाल विवाह बद्दलची माहिती
बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गणेश मोरे यांनी दिली. बाल लैंगिक या विषयीची
माहिती कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत दिली. बाल संरक्षण विषयक यंत्रणेची
माहिती बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीब पठाण यांनी दिली. तसेच ग्राम बाल संरक्षण समिती कामकाज
विषयक चित्रफितीचे प्रदर्शन समुपदेशक सचिन पठाडे यांनी केले. सदर प्रशिक्षणाचे
आयोजन श्री. व्ही.जी.शिंदे जिल्हा महिला
व बाल विकास अधिकारी हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
*****
No comments:
Post a Comment