24 October, 2026

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान व जंतनाशक मोहीम कार्यशाळा वसमत येथे संपन्न

   हिंगोली, (दि.२४ऑक्टोबर):-वसमत येथे गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटावाड यांच्या अध्यक्षतेखाली "माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान" व "जंतनाशक मोहीम" यांची तालुकास्तरीय कार्यशाळा गुरुवारी पार पडली. 

   या कार्यशाळेस तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा गट प्रवर्तक तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

   कार्यशाळेत गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटावाड व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान, जंतनाशक मोहीम, "तिशीचा पल्ला, आरोग्य अन् तपासणी सल्ला" अभियान, एनक्यूएएस, असंसर्गजन्य आजार,  यु-विन पोर्टल, गरोदर माता नोंदणी तसेच इतर आरोग्यविषयक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

   सर्व आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी विहित उद्दिष्टांप्रमाणे वेळेत पूर्ण करावी, तसेच आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांनी समन्वयाने काम करून प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशा सूचना दिल्या.

No comments: