28 October, 2026

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ : पहिल्या फेरीची मतमोजणी आकडेवारी

           ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पहिल्या फेरीत ७०,५१९ मतपत्रिकांची मोजणी झाली. त्यापैकी ६४,८१० मते वैध, तर ५,७०९ मते अवैध ठरली.

        पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना २७,९९४, सतीश भानुदासराव चव्हाण यांना २०,११६, तर रविराज उर्फ अण्णासाहेब सावळे-पाटील यांना ७,४२४ मते मिळाली आहेत.

        पहिल्या फेरीत डॉ. पाटील हे ७,८७८ मतांनी आघाडीवर आहेत. ही प्राथमिक फेरीची आकडेवारी असून पुढील मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे.

        पहिल्या फेरीत ५७०९ मतपत्रिका अवैध ठरल्या आहेत.

        #औरंगाबादपदवीधरमतदारसंघ #मतमोजणी२०२६ #GraduatesElection #ElectionCounting #ChhatrapatiSambhajinagar

No comments: