27 October, 2026

माणिक स्मारक विद्यालय येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

हिंगोली, दि. २७ ऑक्टों : आरोग्य विभाग जिल्हा परिषद, हिंगोलीच्या वतीने  माणिक स्मारक विद्यालय हिंगोली येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यकाम पार पडला.

 जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील बालक-किशोरवयीन मुला-मुलींना जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील माणिक स्मारक विद्यालयामध्ये आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस आणि शिक्षण अधिकारी (माध्यमिक) विपुल भागवत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र पुरी यांच्या हस्ते करण्यात आले.

 *जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके* यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले की बालकांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी जंत नाशक गोळी ही दर सहा महिन्यातून एकदा सेवन करणे आवश्यक आहे.“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे,” यासाठी जंत नाशक मोहीमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. असे त्यांनी  स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी जंतनाशक गोळ्याचे सेवन करण्यासाठी पालक व शिक्षकांना आवाहन केले आहे.

 *जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस* यांनी जंतनाशक मोहिमेचे महत्त्व विशद करताना ते म्हणाले की, लहान मुलांमध्ये जंतसंसर्गमुळे होणारा कृमी आजारा मुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक वाढीवर, पोषणावर आणि एकूण आरोग्यावर दुष्परिणाम होतो. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी जंतनाशक गोळीचे सेवन करणे आवश्यक आहे. 

 *जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र पुरी* यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना असे सांगितले की शासनाची ही मोहीम बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण असून, जंतनाशक गोळ्यां सेवन केल्यामुळे आतड्यातील जंतसंसर्गावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. आणि विद्यार्थ्यांची शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी मदत होते. 

यावेळी जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. एस. राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता डुडळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, डॉ. रणजीत मस्के, डॉ. विजय चुकेवार, औषध निर्माण अधिकारी राहुल घुगे, डिपीएचएन मनिषा वडकुते, स्वाती जरांडे, कार्यक्रम सहाय्यक प्रदीप आंधळे, कमलेश इसी, विजय पाठक, नागसेन भालेराव राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील सदस्य आणि शाळेतील शिक्षेक विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. के एस राठोड यांनी आभार मानले.

No comments: