हिंगोली, दि. २१ ऑक्टो (जिमाका) : महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ अंतर्गत ५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे-चावरे यांनी आज २१ ऑक्टोबर २०२६ रोजी वसमत तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला.
यानिमित्त त्यांनी तहसील कार्यालय, वसमत येथे भेट देऊन मतदान केंद्र क्रमांक ४०६ (तहसील कार्यालय, वसमत) या केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली.
या वेळी निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची त्यांनी पडताळणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
निवडणूक निरीक्षक यांनी वसमत तालुक्यातील एकूण ९ मतदान केंद्रांची सविस्तर माहिती घेतली. तसेच निवडणूक प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या मतपत्रिका उपकोषागार अधिकारी, वसमत यांच्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात आल्या आहेत. त्या सुरक्षा कक्षाचीही त्यांनी पाहणी केली.
या दौऱ्याप्रसंगी विभागीय संपर्क अधिकारी उपजिल्हाधिकारी रामेश्वर रोडगे , जिल्हास्तरीय संपर्क अधिकारी उपजिल्हाधिकारी राजेश सरवदे, विभागीय वन अधिकारी श्रीमती पुष्पा पवार, उपविभागीय अधिकारी वसमत विकास माने आणि तहसीलदार सारंग चव्हाण हे उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment