▶️ राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिन; शहीद शूर पोलिसांना वाहिली श्रद्धांजली
▶️ हवेत तीन फैरी झाडून मानवंदना
हिंगोली, दि. २१ (जिमाका) : राष्ट्रीय पोलीस स्मृतिदिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संत नामदेव, पोलीस कवायत मैदानावरील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. देशाची सुरक्षा, नागरिकांचे संरक्षण आणि कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर पोलीस हुतात्म्यांना त्यांनी विनम्र अभिवादन केले. तसेच हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, पोलीस उपअधीक्षक कमलेश मीना, पोलीस उपअधीक्षक हरिश गवळी आदींसह पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. त्यांनीही स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. पोलीस हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले. यावेळी पोलिस दलाच्यावतीने हवेत तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.


No comments:
Post a Comment