22 October, 2026

औंढा नागनाथ विकासकामांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आढावा

                                                           

हिंगोली, दि. २२ ऑक्टोबर (जिमाका) : श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या प्रगतीचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा घेतला.

            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, तहसीलदार हरीश गाढे, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

        औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटी २१ लाख रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात १७८ कोटी ३४ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. दोन्ही टप्प्यांसाठी एकूण १९३ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती, तांत्रिक व प्रशासकीय प्रगती याबाबत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

No comments: