10 January, 2025

राज्य शिक्षक पात्रता परीक्षेतील (उर्दू माध्यम) एक प्रश्न छपाई दोषामुळे रद्द

हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 10 नोव्हेंबर, 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा-2024 चे पेपर एक (इयत्ता पहिली ते पाचवी गट), पेपर दोन (इयत्ता सहावी ते आठवी गट) ची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://mahanet.in या संकेतस्थळावर दि. 2 जानेवारी, 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. यामधील पेपर दोन उर्दू माध्यमातील एक प्रश्न छपाई दोषामुळे रद्द करण्यात आलेला आहे. हा प्रश्न पुढील संच क्रमांकातील आहे. यामध्ये संच क्रमांक ए मधील 22, बी मधील 17, सी मधील 12 आणि डी मधील 7 व्या क्रमांकावर असलेले प्रश्न रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ढोक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. *****

No comments: