21 January, 2025

पिंपळदरी येथील यात्रेमध्ये चाईल्ड हेल्प लाईनकडून जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या सूचनेनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील यात्रेमध्ये चाईल्ड हेल्पलाईन कक्षामार्फत चाईल्ड हेल्प लाईन 1098 बाबत जनजागृती करण्यात आली. या जनजागृती कार्यक्रमात नागरिकांना 0 ते 18 वर्षे वयोगटातील काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बालक आढळल्यास 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच त्यांना चाईल्ड हेल्पलाईनचे पॉम्प्लेट व लाऊड स्पीकरद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी चाईल्ड हेल्पलाईनचे जिल्हा प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे व समुपदेशक अंकुर पाटोडे व पर्यवेक्षक विकास लोणकर, केस वर्कर राजरत्न पाईकराव, सुरज इंगळे, तथागत इंगळे तसेच यात्रेला आलेले नागरिक व बालके मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ******

No comments: