03 January, 2025

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी मोफत प्रशिक्षणासाठी उद्योजकता केंद्राकडे नोंदणी करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 03 : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सोलर पॅनल इंस्टॉलेशन तसेच अमृत बेकरी व अमृत आयात निर्यात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील अमृत संस्थेच्या लक्ष्यीत गटातील उमेदवारांसाठी अमृत सोलार पॅनल हा कार्यक्रम 7 ते 24 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित केला आहे. सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती, महिलांसाठी निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल. हे कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर व लातूर या ठिकाणी होणार आहेत. सोलर ऊर्जा निर्मितीसाठी शासनाने सबसिडीच्या दरामध्ये शेतकरी तसेच लाभार्थ्यांना सोलर पॅनल देत आहेत. परंतु सोलर पॅनल, इन्स्टॉलेशन, मेन्टेनन्स दुरुस्ती करणारे मनुष्यबळ कमी प्रमाणात उपलब्ध आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवक, युवती व महिलांना रोजगार व उद्योग करण्याची संधी या प्रशिक्षणा‌द्वारे उपलब्ध होणार आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील आयात निर्यात वाढीच्या दृष्टिकोनातून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी अमृत आयात-निर्यात या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बेकरी व्यवसायास नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी अमृत बेकरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरील तीनही प्रशिक्षणाकरिता उमेदवाराची प्रत्यक्ष निवड मुलाखती‌द्वारे करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी असून पदवीधर व तांत्रिक पदवीधारकास प्राधान्य असेल. यासाठी किमान वयोमर्यादा 21 ते 50 वर्ष आहे. अधिक माहिती व नोंदणीकरिता महाराष्ट्र उद्योजकता केंद्र, द्वारा जिल्हा उद्योाग केंद्र, दुसरा मजला एस-12, जिल्हाधिकारी प्रशासकीय कार्यालय, नांदेड रोड, हिंगोली या ठिकाणी व मो. न. 9765291785 वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्यो जकता विकास केंद्र, हिंगोली यांनी केले आहे. *******

No comments: