हिंगोली (जिमाका), दि. 03 : भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, थोर समाजसुधारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी तहसीलदार (महसूल) आश्विनकुमार माने, नायब तहसीलदार संतोष बोथीकर यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment