06 January, 2025
जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिन साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 06 : येथील जिल्हा माहिती कार्यालयात आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रथमतः मराठी पत्रकार सृष्टीचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील ‘दर्पण’ हे वृत्तपत्र 6 जानेवारी, 1832 रोजी प्रकाशित करुन मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती. हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल, तुकाराम झाडे, सुभाष अपुर्वा, कल्याण देशमुख, प्रसाद आर्वीकर, शाम सोळुंके, प्रकाश इंगोले, दिलीप हळदे, यु.एच.बलखंडे, सचिन कावडे, विलास जोशी, बाबाराव ढोकणे, सुधाकर वाढवे, राजेंद्र हलवाई, मनीष खरात, संदीप नागरे, माधव दिपके, पल्लवी अटल, नंदकिशोर कांबळे, सुधीर गोगटे, बालाजी पाठक, शिवाजी कऱ्हाळे, प्रेस फोटोग्राफर सुनिल पाठक, विजय गुंडेकर, चंद्रकांत वैद्य, अरुण दिपके, हाफीज बागवान, बाळू जाधव, समाधान कांबळे, गजानन मगर, एफ. टी. नागरे यांच्यासह इतर पत्रकार, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, वरिष्ठ लिपिक आशा बंडगर, कैलास लांडगे, रामकिशन तोकले, गंगा देशमुख आदींची उपस्थिती होती.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment