09 January, 2025

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी घेतला गिरगाव आरोग्यवर्धिनी केंद्राचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्हाधिकारी अभिनव गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी आरोग्यवर्धिनी केंद्र गिरगाव येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच यावेळी प्रामुख्याने एनक्यूएएस (NQAS), कायाकल्प, आरसीएच (RCH) पोर्टल, एनसीडी (NCD) पोर्टल या सर्व आरोग्य विषयक कार्यक्रमाचा आढावा घेत मार्गदर्शन केले. यामध्ये सर्व निर्देशांकानुसार (इंडिकेटर) शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा सूचना बैठकीमध्ये देण्यात आल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद आतुरकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव पोले, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. प्रशांत पुठावार, साथरोग तज्ञ डॉ. इनायत खान, सनियंत्रण व मूल्यांकन अधिकारी अमोल कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक कदम, डॉ. वैजनाथ सूर्यवंशी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रविकुमार करवंदे, डॉ. कोमल एगडे, डॉ. शरद अडकीने, औषध निर्माण अधिकारी गणेश चव्हाण यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गटप्रवर्तक व आशा वर्कर उपस्थित होत्या. ******

No comments: