16 January, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘जल परिषद’

*जलपुरुष राजेंद्रसिंह राणा करणार उपस्थितांना मार्गदर्शन* *हिंगोली, दि.16,(जिमाका):* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासन जल आणि पर्यावरण संवर्धनाचे काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9.30 वाजता सुरु होणाऱ्या या परिषदेला जलपुरुष तथा मॅगेसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह राणा आणि ‘यशदा’चे महासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, चला जाणूया नदीला अभियान समितीचे सदस्य सचिव, जलयुक्त शिवार अभियान समितीचे सदस्य, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार समिती सदस्य, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, जलसाक्षरता केंद्र समिती, रोजगार हमी योजना केंद्र समिती, जैवविविधता समिती आणि पंचायत विकास इंडेक्स समितीचे सदस्य यावेळी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. *****

No comments: