29 September, 2016

आदिवासी सेवक व आदिवसी सेवा संस्था पुरस्कार
सन 2015-2016 व 2016-2017 साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

          हिंगोली, दि. 29 :- महाराष्ट्र राज्यात आदिवासी कल्याणाच्या / विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस तसेच सामाजिक संस्था अनुक्रमे आदिवासी सेवक व सेवा संस्था यांना अनुक्रमे आदिवासी सेवक व सेवा संस्था पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
            त्यानुसार आदिवासी सेवकासाठी सन 2015-2016 व 2016-2017 या वर्षाकरिता अनुक्रमे 15+15 असे एकूण 30 आदिवसी सेवक पुरस्कार व आदिवासी सेवा संस्था यांना सन 2015-2016 व 2016-2017 चा वर्षाकरिता अनुक्रमे 7+7 असे एकूण 14 आदिवासी सेवा संस्था पुरस्कार देण्याचे विचाराधीन आहे.
            याकरिता महाराष्ट्र  राज्यात आदिवासी कल्याणाच्या / विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी तसेच सामाजिक संस्थांनी अनुक्रमे आदिवसी सेवक आदिवासी सेवा संस्था पुरस्कारासाठी विहीत नमुन्यात अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , कळमनुरी जि. हिंगोली यांच्याकडून माहे सप्टेंबर, 2016 अखेर आवश्यक त्या कागदपत्रासह पुराव्यासह सादर करावेत.
            आदिवसी सेवक व संस्था पुरस्कार योजनेचा विहीत अर्जाचा नमुना आवश्यक कागदपत्र तसेच या योजनाची तपशिलवार माहिती www.mahatribal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे एकात्मक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी यांनी कळविले आहे.

*****

No comments: