28 September, 2016

जिल्ह्यात शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न

हिंगोली, दि. 28 :-  क्रिडा व युवक सेवा संचलनालय, पुणे व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, हिंगोली जिल्हा स्पोर्टस कराटे डो असोसिएशन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा संपन्न झाली.
सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा प्रशिक्षण क्रिडा संकुल हिंगोली येथे करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून तहसिलदार विजय अवधाने तर अध्यक्ष जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी भूषविले. तर प्रमुख उपस्थितीत किशोर पाठक, संजय बेत्तीवार, अन्सारी, जिल्हा स्पोर्टस कराटे डो असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल इसावे, सचिव संतोष नांगरे यांची उपस्थिती होती. स्पर्धेत 14, 17 व 19 वर्ष वयाच्या जिल्ह्यातील शालेय मुला-मुलींना सहभाग नोंदविला.
शालेय मुला, मुलींना स्पर्धेत खेळत असताना जय-पराजय होतच असतो तो खेळाचा भाग असतो तो खेळाचा भाग असतो. म्हणून पराजय झाल्यास खचुन जाऊ नये जोमाने तयारी करून यश संपादन करावे. विशेषत मुलींनी ही कला आत्मसात करावी. व स्व:ताचे रक्षण करत निर्भयतेने जगावे. असे मत तहसिलदार अवधाने विजय यांनी व्यक्त केले.
स्पर्धा यशस्वीतेकरिता पंच म्हणून सुनिल कांबळे, अमोल ढगे, विक्की इसावे, हर्षद खरे, बालाजी शिंदे, धनंजय धुळधुळे, नवनाथ बांगर, कु. संपना नागरे यांनी कामगिरी बजावली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका संयोजक रामप्रकाश व्यवहारे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय बेत्तीवार क्रिडा अधिकारी यांनी मानले.

*****

 

No comments: