जिल्ह्यात या
हंगामात 93.73 टक्के पावसाची नोंद
हिंगोली, दि. 27 :- जिल्ह्यात मंगळवार दिनांक 27
सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 8.36 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात
सरासरी 1.67 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात
आतापर्यंत सरासरी 834.54
मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात या हंगामात पडलेल्या पावसाची टक्केवारी 93.73 टक्के झाली
आहे.
जिल्ह्यात
या हंगामात आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुका निहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. (सर्वाधिक
ते उतरत्या क्रमाने )
औंढा नागनाथ - 110.40, हिंगोली - 100.80, वसमत - 89.23, कळमनुरी - 87.96, सेनगांव
- 81.84 जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी 93.73 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात मंगळवार दिनांक 27
सप्टेंबर, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) : हिंगोली - 2.86 (844.31), वसमत - निरंक (891.68), कळमनुरी - निरंक (826.47), औंढा नागनाथ - निरंक (924.75), सेनगांव - 5.50 (685.49). आज अखेर पावसाची सरासरी 834.54
इतकी
आहे.
*****
No comments:
Post a Comment