फिरते लोकन्यायालयाचे 6 ते 29 सप्टेंबर कालावधीमध्ये आयोजन
हिंगोली,
दि.01: मा. उच्च न्यायालय,
विधी देखरेख उपसमिती, औरंगाबाद यांचे आदेशानुसार परभणी न्यायीक जिल्ह्यामध्ये दि.
6 ते दि.9 सप्टेंबर, 2016 या कालावधीमध्ये फिरते लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले
आहे. जिल्हा न्यायालय, परभणी येथे फिरते लोक न्यायालय व शिबिरांचे वाहन जिल्हा
न्यायालय, परभणी येथे येणार असुन त्याचे उद्घाटन सकाळी 10:30 वाजता होणार आहे.
त्यानंतर
सर्व प्रकारची दिवाणी व फौजदारी प्रलंबीत प्रकरणे तडजोडीद्वारे मिटविण्यासाठी
फिरते लोक न्यायालयाचे आयोजन परभणी जिल्हा न्यायालय परिसरात करण्यात आले आहे.
परभणी व हिंगोली जिल्ह्यामधील तालुक्याअतंर्गत असलेल्या गावी
फिरते लोक न्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण, परभणीचे सदस्य सचिव सुधाकर एन. सोनवणे यांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment