जिल्हा
परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत 5 ऑक्टोबरला
हिंगोली,
दि.27: राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या
सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग
रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घोषित केला असून, नोव्हेंबरमध्ये अंतिम प्रभाग
रचना व आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यानूसार जिल्हा परिषद, पंचायत समिती
आरक्षण सोडत काढण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद, पंचायत
समिती (जागांच्या आरक्षणाचे पध्दत व चक्रानुक्रम) नियम 1996 नूसार अनुक्रमे
निवडणुक विभाग व निर्वाचक गण प्रसिध्दी करण्यापुर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती
क्षेत्रात सभा घेवून अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह राखुन
ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी पुढीलप्रमाणे सोडत पध्दतीने
कार्यवाही करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
अ.क्र.
|
जिल्हा परिषदेचे नाव / पंचायत
समितीचे नाव
|
सभेचे ठिकाण
|
सभेची वेळ व तारीख
|
1
|
जिल्हा परिषद, हिंगोली
|
जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली
|
सकाळी 11.00 वा, दि. 05 ऑक्टोबर,
2016
|
2
|
पंचायत समिती, हिंगोली
|
तहसिल कार्यालय, हिंगोली
|
सकाळी
11.00 वा, दि. 05 ऑक्टोबर, 2016
|
3
|
पंचायत समिती, कळमनुरी
|
तहसिल कार्यालय, कळमनुरी
|
सकाळी
11.00 वा, दि. 05 ऑक्टोबर, 2016
|
4
|
पंचायत समिती, सेनगाव
|
तहसिल कार्यालय, सेनगाव
|
सकाळी
11.00 वा, दि. 05 ऑक्टोबर, 2016
|
5
|
पंचायत समिती, औंढा (ना.)
|
तहसिल कार्यालय, औंढा (ना.)
|
सकाळी
11.00 वा, दि. 05 ऑक्टोबर, 2016
|
6
|
पंचायत समिती, वसमत
|
तहसिल कार्यालय, वसमत
|
सकाळी
11.00 वा, दि. 05 ऑक्टोबर, 2016
|
जिल्हा परिषद, पंचायत
समितीतील ज्या नागरिकांना या आरक्षण सोडत कार्यक्रमास उपस्थित राहण्याची इच्छा
आहे. त्यांनी वरीलप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या सभेस उपस्थित रहावे. असे
जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment