जिल्हयात कलम 37 (1) (3)
अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू
हिंगोली, दि. 13 :- जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)
(3) चे आदेश दिनांक 13 सप्टेंबर, 2016 रोजीचे 06.00 वा.
पासुन ते 27 सप्टेंबर, 2016 रात्रीच्या
12 वाजेपर्यंत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी लतीफ पठाण
यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात आगामी काळात दिनांक 05 ते 15 सप्टेंबर, 2016 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. तसेच
दिनांक 15 सप्टेंबर, 2016 रोजी अनंत चतुर्थी असल्याने जिल्ह्यात स्थापन झालेल्या श्री
गणेश मुर्तीचे विसर्जन होणार आहे. तसेच हिंगोली शहर येथे चिंतामणी गणपती येथे भाविकांची
मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तसेच दिनांक 17 सप्टेंबर, 2016 रोजी मराठा समाजातर्फे
कोपर्डी प्रकरणानिमित्त व मराठा समाजास आरक्षण यानिमित्ताने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात
आले असून सदर काळात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच
राज्यात घडत असलेल्या घटनांच्या अनुषंगाने राजकीय प्रतिक्रीया त्यामुळे होणारे संभाव्य
धरणे, मोर्चे,
रास्तारोको, उपोषण, बंद, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन सारखे आंदोलन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या दरम्यान उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्हयात दि. 13 सप्टेंबर, 2016 ते 27 सप्टेंबर,
2016 रोजी मध्यरात्री 12.00वा. पावेतो मुंबई पोलिस कायदा 1951 कलम
37 (1) (3) चे आदेश लागू करण्यात
आले आहे.
*****
No comments:
Post a Comment