01 September, 2016

 नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळाना 
सार्वजनिक गणेशोत्सव  अभियान स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 01 :-   लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या " स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"  या घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्त यावर्षी  "लोकमान्य  गणेशोत्सव अभियान"  व                         "लोकमान्य उत्सव" राबविण्यात येणार आहे. या अभियानातंर्गत स्वदेशी, साक्षरता, बटी बचाओ, व्यसनमुक्ती व जलसंवर्धन या विषयावरील कल्पनेशी निगडीत देखाव्याची स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता हिंगोली तालुक्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळानी सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दिनांक 5 सप्टेंबर, 2016 पुर्वी विहीत नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
ज्या गणेश मंडळांनी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे नोंदणी  केली आहे. अशा गणेश मंडळाची पाहणी तालुकास्तरीय पथकाकडून करण्यात येईल व तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय , तृतीय असे क्रमांक निवडले जातील. सदरील निवडीसाठी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय पारितोषिक 15 हजार व तृतीय पारितोषिक 10 हजार रुपये अशी रोख रक्कम देण्यात येणार आहे.
ज्या गणेश मंडळांना या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावयाचे आहे. त्यांनी दिनांक 5 सप्टेंबर,, 2016 रोजीपूर्वी विहीत नमुन्यातील अर्ज पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सादर करावेत.

***** 

No comments: